नाणेकरवाडी गाव है औद्योगिक क्षेत्रात असल्याने स्थानिकांबरोबर येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत आहे. ग्रा. पं. मार्फत पिण्याचे पाणी व वापरायचे पाणी योग्य तथा मुबलक मिळत नाही त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर ग्रा. पं. ला लेखी तथा तोंडी व प्रत्यक्ष भेटून पाणी मिळणेबाबत वेळोवेळी निवेदन देवूनही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
गावातील नागरिकांना चांगला, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासंबंधी ठोस कारवाही करावी व पाण्याचे टँकरने गावाला पाणीपुरवठा करावा. तसेच नवनाथ मुटके ते बाबुभाई शहा पेट्रोल पंप हा रस्ता सिमेंट कॉंक्रिट करण्यात यावा.
अन्यथा पुढील काळात पं. स. खेड येथील अधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन विस्तार अधिकारी अजय जोशी यांना भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाब खांडेभराड, भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडी खेड तालुका अध्यक्ष सुर्यकांत बारणे, भारतीय जनता पक्ष चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.