
समाजामध्ये आपण डॉ. हे व्यावसायिक रूपा मध्ये नेहमी पाहत असतो. पण देहूगावं मध्ये असे एक डॉ. आहेत की व्यवसाय कमी पण समाजाची सेवा करण्यात नेहमी व्यस्त असतात. नेहमी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे व वारकरी संप्रदायाची व पंचक्रोशीतील लोकांची समाजसेवा करणे हाच ध्यास मनामध्ये ठेवून त्यांचे काम सुरू असते.
डॉ. लोहार असे एक डॉक्टर आहेत.की , ज्यांनी जगात मुलगी वाचवा हा संदेश पोहचवला. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.मागील 2 वर्षच्या करोना महामारी मध्ये अनेक रुग्णानां जीवनदान दिलेआहे. याची दखल घेऊन डॉक्टरनां विविध क्षेत्रातील 18 करोना योद्धा सन्मान त्यांना मिळाले आहेत. 22 मार्च 2022 ला त्यांना पुण्यामध्ये राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
तसेच तीर्थ क्षेत्र भंडारा डोंगर देहू येथे दर महिन्याला तिथे राहणारे सर्व सेवेकरी यांची मोफत तपासणी करण्याचे काम डॉ.करतात. देहू पंचक्रोशी मध्ये तसेच सर्व महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असणारे डॉ. प्रमोद रामराव लोहार यांनी 20/6/2022 रोजी जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने आषाढी वारी निमित्त जगभरातून आलेल्या सर्व वारकरी बंधू-भगिनी यांचे मोफत सर्व रोग निदान शिबीर आणि मोफत सल्ला आपल्या श्री. मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिर समोरच ठेवले आहे. तरी या शिबिरात सांधे दुखी आजार , गुडघेदुखी आजार , त्वचारोग , जुनाट दमा , मूळव्याध ,थंडी , ताप , खोखला या विविध प्रकारच्या आजारावर
सर्व वारकरी बांधव व भगिनी साठी या शिबीराचे आयोजन केले आहे तरी या शिबाराचा लाभ सर्वांनी घ्यावा.
ठिकाण :-
डॉ.प्रमोद रामराम लोहार.
श्री. मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिर समोर संत तुकाराम महाराज विद्यालय शेजारी देहूगावं.
मोबाईल क्र. 9822456982.
