चाकण येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालय येथे राजमाता जिजाऊ स्मृतिदिना निमित्त जिजाऊ प्रतिमेचे पूजन केले, विद्यालयातील विद्यार्थिनींनी भाषणे आणि पोवाडे सादर केले, सहशिक्षिका सौ. रुपाली हुलुळे यांनी जिजाऊंची संपूर्ण माहिती सांगितली. सर्व मुलींनी जिजाऊच्या वेशभूषा नऊवारी परिधान करून आल्या होत्या.
श्री. एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्था संचलित, विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या प्राचार्या प्रा. अर्चना प्रविण आघाव यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले. अशी माहिती विद्यालयाच्या उप प्राचार्या सौ. संध्या जाधव यांनी माहिती दिली.