भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे, पुणे जिल्हा विद्युत संनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना नागरी सुविधा मिळवुन देण्यासाठी निगडी येथील अति.कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी मलिदा कमविण्यासाठी तयार केलेल्या मनमानी कार्यपद्धती विरोधात आंदोलन करण्यात आले.
नागरिक विविध प्रकारच्या कामानिमित्त प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक महावितरणच्या कार्यालयात येत असतात परंतु अति.कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी खुर्चीचा गैरवापर करून ज्येष्ठ तसेच सामान्य नागरिकांना तासनतास आपल्या केबिनच्या बाहेर उभे करतात. अश्या तक्रारी शिवसेना विभागाकडे आली होती. साधारणतः महावितरणच्या चुकीमुळे लाईट बिल चुकीचे येणे, मिटर नादुरुस्त / जळालेले असल्यास ते बदलून मिळणे, वास्तविक मिटर बदली करून देणे आपल्या कंपनीची जबाबदारी असतांना सुद्धा मीटर कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे ग्राहक यांनी स्वतः मिटर विकत घेतलेले असतांना विनाकारण चेकिंग च्या नावाखाली स्वतःची काही कमाई होते काय ते बघण्यासाठी
ग्राहकांस आठ दहा दिवस आपल्या केबिन समोर उभे करून ठेवतात.
तसेच शिक्षणाचा अधिकार हा शासनाने दिलेला आहे त्यासाठी नागरिकांना काही बोनाफाईड सर्टिफिकेट सारखे दाखले हवे असतात त्यासाठी नागरिक नियमानुसार फी भरण्यास तयार असतांना सुद्धा सदर दाखला नागरिकांना देत नाही. या आंदोलनामध्ये शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे, उपविभागप्रमुख गणेश इंगवले, गणेश भिंगारे, शाखाप्रमुख सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण उपशाखा प्रमुख कैलास तोडकर, अरुण ढाके, युवासेना शहर प्रमुख पिंपरी चिंचवड अजिंक्य उबाळे, युवासेना भोसरी विधानसभा प्रमुख अमित शिंदे, उपविधानसभा अधिकारी सुनील समगीर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे आदी उपस्थित होते.
यावेळी चौधरी यांना शिवसेना शाखा रुपीनगर च्या वतीने निवेदन देण्यात आले व पुणे येथील मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्याशी मिलिंद चौधरी यांच्या समोर भ्रमणध्वनी चर्चा केली. त्यांनी ताबडतोब ग्राहकांना त्रास होणार नाही यांची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. यापुढे जर नागरिकांना विनाकारण आपण त्रास दिल्यास रास्ता पेठ येथील कार्यालयासमोर नागरिकांना सोबत घेऊन शिवसेना बेमुदत लाक्षणीक उपोषणाला बसणार आहे असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.