राजगुरूनगर न्यायालयातील विविध प्रश्नांबाबत जिल्हा मुख्य न्यायाधीश यांना निवेदन

खेड बार असोसिएशन तर्फे मुख्य जिल्हा न्यायाधीश पुणे संजय देशमुख यांना राजगुरुनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या प्रश्नांबाबत निवेदन दिले. या निवेदनात पुढील बाबींचा समावेश आहे.

१) राजगुरुनगर न्यायालयाची जुनी इमारत व या इमारतीमध्ये बऱ्याच सुख सुविधांचा अभाव आहे .त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाल्यास न्यायालयासमोर असलेला बगीचा हा आज रोजी नाहीसा होताना दिसत आहे. त्यामुळे सदर बगीच्यामध्ये पी.डब्ल्यू.डी.मार्फत योग्य ते सुशोभीकरण करण्यासाठी व पक्षकारांना बसण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयातील टॉयलेट यामध्ये स्वच्छता नसते खूप दुर्गंधी असते तसेच बऱ्याच दरवाजांना कडी- कोंडा नाही . तसेच न्यायालयातील प्रत्येक मजल्यावर पक्षकारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.


२) न्यायालयामध्ये काम करत असताना न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संख्या कमी असल्यामुळे नकला मिळण्यास , दाव्याचे समन्स ,नोटीस तयार करण्यास विलंब होतो , फौजदारी प्रकरणांमधील वारंट ची कामगिरी लवकर तयार करून न मिळाल्याने प्रकरण लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे राजगुरुनगर न्यायालयामध्ये आवश्यक असलेल्या नवीन न्यायालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे. नवीन न्यायालयीन कर्मचारी नियुक्त केल्यास पक्षकारांना जलद गतीने न्याय देणे शक्य होईल .


३) राजगुरुनगर न्यायालयामध्ये नवीन इमारतीचे भूमिपूजन होणार असून होणार्‍या इमारतीमुळे सर्व वकील बांधवांना, पक्षकारांना वाहन पार्किंग कमी पडणार आहे. त्यादरम्यान पर्यायी पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. राजगुरुनगर न्यायालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे वकील बांधव त्यांना त्यांचे वाहन पार्किंग करण्याकरिता जागा शिल्लक नसल्यास त्यांना वेळेत न्यायालयात हजर होण्यास देखील अडचण होणार आहे. तसेच पार्किंगच्या अभावामुळे पक्षकारांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे काम चालू असताना पर्यायी पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे.


४) या सर्व बाबींचा आपण विचारविनिमय करून राजगुरुनगर न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये वर नमूद केलेल्या मूलभूत गरजांची पूर्तता करावी .

अशी खेड वकील बार असोसिएशन तर्फे आपणास विनंती केली गेली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!