आज यवतमाळ जिल्ह्यामधील सरुळ, ता. बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ येथील शेतकऱ्याची कापूस, तुर, सोयाबीन व शंखी गोगलगाय चर्चासत्र ची मागणी आली होती. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त मुक्त करणे ही मोहीम सुद्धा बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करण्याचा मानस आहे.
बालाजी फाउंडेशनकडून फक्त धामणगाव रेल्वे तालुक्यांत उपक्रम न राबवता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मागील ३२ दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यात बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून कापूस, तुर, सोयाबीन चर्चासत्र आयोजित केले गेले.
आता बालाजी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक सुजीत मुंदडा सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या हातांनी गावाचे उत्कृष्ट शेतकरी सोळंके काका यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला . सोबतच आमचे मार्गदर्शक सुजीत मुंदडा यांचे सुद्धा संपूर्ण गावकऱ्यांतर्फ बालाजी फाउंडेशनच्या कार्यासाठी सत्कार सुद्धा झाला.
मार्गदर्शक स्वगिऺय डॉ विलासराव देशमुख यांच्या आठवणींना सुध्दा भावनिक उजळा दिला . त्यांचे कार्य पशुवैद्यकीय डाॅक्टर राहुन जी पशुसेवा गाॗमविकास जे कायऺ बाभुळगाव तथा घाटंजी तालुक्यातं झाले तेच कायऺ ग्रामसेवक या पदावर राहुन करण्याचा पुरेपूर प्रयत्न राहील.
आज सुद्धा सकाळ वृत्तपत्र अंतर्गत अग्रोवन खरीप विशेषांक या खरीप विशेष अंकामध्ये १) बीटी कापूस लागवडीतील तंत्र आणि मंत्र २) सुधारित पद्धतीने तूर लागवड ३) मूग उडीद लागवडीचे तंत्र ४) वाढवूया सोयाबीनची उत्पादकता ५) ज्वारीचे एकात्मिक लागवड व्यवस्थापन या विशेष अंकाचे वाटप सुद्धा केले.
या सुप्त उपक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे संपूर्ण गावकऱ्यांनी आभार मानले. प्रत्येक गावांमध्ये गावातील कोणत्या पिकांवर कोणती अडचण त्यानुसार चर्चासत्र ठरली जातात. कापूस पिकांवरील बोंड अळी सोबत सोयाबीन, तुर पिक चर्चा, सोबतच शंखी गोगलगाय निर्मुलन चा विषय सुद्धा घेतला गेला.
आजच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक विवेक चजऺन व विवेक मोरे वैभव अमृतकर साहेब व सोबतच शुभचिंतक कार्तिक मीनाक्षी विलासराव देशमुख उपस्थित होते.