जागतिक पर्यावरण दिना निमित्त चाकण व परिसरातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झित्राईमळा, भामा इंग्लिश मिडियम स्कूल, जिल्हा परिषद शाळा चाकण नं.१ येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य श्री.नितीनभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवी प्रमाणे आज खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धनची गरज आहे. वाढते तापमान व प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून त्यामुळे जागतिक पर्यावरणामध्ये अनेक बदल होत आहेत, त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा एखाद्या महत्वाच्या दिवशी झाडे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे, पर्यावरण वाचले तर पृथ्वी वाचेल अन्यथा जगावर नैसर्गिक मोठे संकट येण्याची दाट शक्यता आहे असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीनभाऊ गोरे यांनी मांडले.दरम्यान योगगुरू ,पर्यावरण मित्र बाप्पू सोनवणे यांचा वाढदिवस झाड लावून साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, शिवसेना शहरप्रमुख मा.नगरसेवक महेशदादा शेवकरी, मा.नगरसेवक निलेश गोरे, उद्योजक सागर गोरे, मा.सरपंच काळूराम गोरे, जेष्ठ नेते पांडुरंग बापु गोरे, शेखर नाना पिंगळे, स्वामी कानपिळे, योगेश गायकवाड, उपशहरप्रमुख अभिजीत जाधव, समाजसेवक मनोहर बापु शेवकरी, नारायण करपे, विशाल बारवकर, धिरज बिरदवडे, प्रमोद पारधी, चंद्रकांत बुट्टे, उद्योजक अमोल गोरे, प्रमोद टीळेकर, सुरेश शेवकरी, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे विद्यालयाच्या प्राचार्य प्रमिला गोरे मॅडम, वनश्री संस्थेचे संजय पुरी, अनुष्का करपे, संतोष गोरे, सचिन गोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण, कलाविष्कार मंच चाकण, वसुंधरा बहुद्देशीय संस्था, स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण, शिवसेना-युवासेना खेड तालुका यांच्यावतीने करण्यात आले होते

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!