स्वराज वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील रासे गावातील विविध कार्यकारी सोसायटीचा सन 2022 ते 2027 कार्यक्रम जाहीर झाला असुन एकूण 12 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे गावातील गटातटाच्या राजकारणाला वेग आला असून सगळ्यांचे लक्ष हे निवडणूकिकडे आहे.यापैकी एका जागा ही बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी कांबळे यांनी सांगितले.
रासे विविध कार्यकारी सोसायटीच्या 12 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाल्याने आता 11 जागांवर बाकीचे उमेदवार आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.त्यामध्ये सोसायटीच्या सर्वसाधारण खातेदार/ कर्जदारांपैकी 16 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
यामध्ये श्री दगडू डावरे, शांताराम डावरे,भीमसेन पवार,अनिरुद्ध मुंगसे, कालिदास मुंगसे, राजाराम मुंगसे, वसंत मुंगसे, विलास मुंगसे,शंकर मुंगसे, सोमनाथ मुंगसे, सुनील वाडेकर, गुलाब शिंदे, पांडुरंग शिंदे, विजय शिंदे, सुभाष शिंदे, संदीप शिंदे असे एकूण 16 उमेदवार यांनी सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तसेच मागासवर्गीय जागेसाठी श्री अनिकेत केदारी, किरण मुंगसे यांनी व भटक्या जाती, जमाती, विशेष मागासवर्गीय जागेसाठी श्री चंद्रकांत कारंडे, बाळासाहेब मायने, यांनी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच सोसायटी पदाच्या महिला राखीव जागेसाठी सौ शारदा डावरे,संगीता डुंबरे, शालिनी मुंगसे या महिलांनी आपले अर्ज दाखल केले असुन श्री गोमाजी दामू थोरात यांना बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रासे कार्यकारी सोसायटीच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असुन उभे राहणाऱ्या उमेदवारांना नारळ, कपबशी ,असे चिन्ह वाटप करण्यात आले आहे.
एकूणच रासे विविध कार्यकारी सोसायटीच्या 23 उमेदवार रिंगणात उतरले असुन कोण बाजी मारणार? गावातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळत आहे.
आता सोसायटीचे सभासद शेतकऱ्यांच्या विकास करणारा कोणता नवीन उमेदवार निवडणार का ? जुन्या उमेदवारांना घरीच बसावे लागणार की परत संधी देणार ? हेच पाहावे लागेल. हे पाहणे मोलाचे ठरणार आहे. गावातील राजकीय वातावरण तापले असुन प्रचाराचा धुरळा लवकरच उडणार आहे.एकूणच होणारी रासे गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष हे येणाऱ्या 12 तारखेला मतदानाकडे लागले आहे.