पिपळखुट्टा (पुनर्वसित) येथे शेतकरी चर्चासत्र.

यवतमाळ जिल्ह्यामधील पिपळखुट्टा (पुर्नवसित ) येथील शेतकऱ्यांची ची कापूस, तुर, सोयाबीन व शंखी गोगलगाय चर्चासत्र ची मागणी होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त मुक्त करणे ही मोहीम सुद्धा बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करण्याचा मानस बालाजी फाउंडेशनचा असून बालाजी फाउंडेशन फक्त धामणगाव रेल्वे तालुक्यांत न राबवता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडे लक्ष केंद्रित करणार आहे.

मागील ३० दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यात बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून कापूस, तुर, सोयाबीन चर्चासत्र आयोजित केले गेले. आज सुद्धा सकाळ वृत्तपत्र अंतर्गत अग्रोवन खरीप विशेषांक या खरीप विशेष अंकामध्ये १) बीटी कापूस लागवडीतील तंत्र आणि मंत्र २) सुधारित पद्धतीने तूर लागवड ३) मूग उडीद लागवडीचे तंत्र ४) वाढवूया सोयाबीनची उत्पादकता ५) ज्वारीचे एकात्मिक लागवड व्यवस्थापन या विशेष अंकाचे वाटप सुद्धा केले.

या सुप्त उपक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे संपूर्ण गावकऱ्यांनी आभार मानले. प्रत्येक गावांमध्ये गावातील कोणत्या पिकांवर कोणती अडचण त्यानुसार चर्चासत्र ठरली जातात. कापूस पिकांवरील बोंड अळी सोबत सोयाबीन, तुर पिक चर्चा सोबतच शंखी गोगलगाय निर्मुलन चा विषय सुद्धा घेतला.

पिपळखुट्टा पुर्नवसित ता. बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ येथे शेतकऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी बालाजी फाऊंडेशन काम करणार आहे. संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्यांत उपक्रमाला मिळणाऱ्या उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आजच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक विवेक चजऺन, विवेक मोरे व सोबतच आपला शुभचिंतक कार्तिक मीनाक्षी विलासराव देशमुख हे उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!