दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती वार्ता :-
दर्यापूर येथील मुर्तीजापूर रोड स्थित असणारे वैभव मंगल कार्यालय येथे आज दुपारी साडेतीन वाजता दर्यापूर मध्ये आलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे व पावसामुळे वैभव मंगल कार्यालय वरील पूर्ण टीम पत्रे उडाले, सदर टीम पत्रे त्या ठिकाणी सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात येऊन पडल्याने पन्नासावर लोक जखमी झाले आहे, यामध्ये जवळपास पाच ते सहा गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जखमींना जवळच्या खाजगी दवाखान्यात व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, यासह या मंगल कार्यालयाच्या समोर उभ्या असणाऱ्या दुचाकी व चारचाकी यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, दर्यापूर येथील मुर्तीजापूर रोड स्थित वैभव मंगल कार्यालयात आज अंजनगाव बारी येथील अंभोरे परिवार यांच्याकडील लग्न सोहळा आयोजित होत आहे, या लग्न सोहळ्यात शेकडो लोक उपस्थित होते.

दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान या लग्न सोहळ्याच्या जेवणावळी सुरू होत्या या दरम्यान दर्यापूर मध्ये आलेल्या वेगवान वाऱ्याने व पावसाने धुमाकूळ घालत या मंगल कार्यालयावरचे तीन पत्रे उडाले, यासह या मंगल कार्यालयाच्या भिंतीच्या विटा सुद्धा काही उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्या सदर तीन पत्रे उडून कार्यालयातच पडल्याने पन्नास लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, या प्रकारामुळे सदर लग्न सोहळ्यामध्ये एकच धावपळ उडाली, सर्वचजण वाट दिसेल तिकडे धावत होते, काही वेळानंतर वारे शांत झाल्याने व पाऊस थांबल्याने जखमींना प्रथममोपचार देण्यात आले, या सह गंभीर जखमींना दर्यापूरातील खाजगी रुग्णालयात तथा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहींना अमरावती रुग्णालयात हलविण्यात आले आहे, कार्यालयाच्या आसपास उभ्या असणार्या दुचाकी व काही कारचे सुद्धा नुकसान झाले आहे. तर अन्य लोकांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले.

गंभीर जखमी
सुरेंद्र सोळंके (४०), मालू खंडारे (६५), पांडुरंग तेलखेडे (६५), पवन साखरे (१९), अंकित ठाकरे (१८), बिटू काबळे (५), श्रीकृष्ण डाबेकार (६०), देविदास पोटफोले (६०), चंरदास ठाकरे (५५), श्रीकांत काळबंडे (२४), नवल ठाकरे (१९),
किरकोळ जखमी
शोभा मालवे (६५), मंगला सोळंके (५०), ईश्वर पवार (१२), ऋत्विक ठाकरे (१९), वंश मालवे (१५), देविदास तेलगोटे (६०), रोहित तासरे (१६), आकाश कोगदे (१३), नंदा कोगदे (१३), करण सोळंके (२५)
तर अन्य लोकांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले.
