चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकन शहराच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
चाकण शहरात आगामी काळात निवडणूका होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यांची विविध पक्ष कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट घेतली गेली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. निवडणूक पुर्व काळात मुख्याधिकारी यांच्या बरोबर चांगले संबंध निर्माण करून मनसे चाकण नगरपरिषद निवडणुकीत वेगळा ठसा उमटविण्याच्या तयारीत आहे.
चाकण शहरातील विविध समस्या, त्यावरील उपाय योजना व आगामी कार्यक्रम उपक्रम याबाबत मनसे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात चर्चा झाली. मनसे चाकण नगरपरिषद निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे मनसे चाकण शहर अध्यक्ष दत्ता परदेशी यांनी स्वराज्य वार्ता प्रतिनिधीला सांगितले.
यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, मनसे पुणे जिल्हा संघटक अभय वाडेकर, मनसे चाकण शहर अध्यक्ष दत्ता परदेशी, मनसे चाकण शहर उपाध्यक्ष भानुदास सागर, मनसे चाकण शहर सरचिटणीस आदित्य गोरे, मनसे चाकण शहर संघटक प्रणव घाटकर, मनसैनिक विक्रम भालेराव उपस्थित होते.