बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून निबोरा बोडका ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे मागील काही दिवसांपासून सकाळ वृत्तपत्र अंतर्गत अग्रोवन खरीप विशेषांक या खरीप विशेष अंकामध्ये
१) बीटी कापूस लागवडीतील तंत्र आणि मंत्र
२) सुधारित पद्धतीने तूर लागवड
३) मूग उडीद लागवडीचे तंत्र
४) वाढवूया सोयाबीनची उत्पादकता
५) ज्वारीचे एकात्मिक लागवड व्यवस्थापन
या विशेष अंकाचे वाटप केले गेले. या उपक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे संपूर्ण गावकऱ्यांनी आभार मानले.

प्रत्येक गावामध्ये गावातील कोणत्या पिकांवर कोणती अडचण त्यानुसार चर्चासत्र ठरवली जातात. कापूस पिकांवरील बोंड अळी सोबत सोयाबीन तुर पिक चर्चा, सोबतच शंखी गोगलगाय निर्मुलन चा विषय सुद्धा घेतला गेला. सोबतच ग्रामपंचायत नी शंखी गोगलगाय बद्दल ठराव घेऊ ही ग्वाही सुद्धा दिली. बीबीएफ टेकक्निक तथा ऑरगॅनिक कार्बन वाढीसाठी चर्चा सत्र
निबोरा बोडका ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे घेण्यात आले. शेतकरी माऊलीने एवढे वषऺ जगवल त्यांचे ऋण फेडण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्यांत या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक विवेक चजऺन व विवेक मोरे व सोबतच आपला कार्तिक मीनाक्षी विलासराव देशमुख हे होते.