
श्री क्षेत्र निमगाव खंडोबा हे बारा मल्हार पैकी एक असून कोरोना काळानंतर प्रथमच आलेल्या सोमवती अमावस्येला भाविकांनी हजारोंनी उपस्थिती दाखवली. सकाळी ठीक १० वाजता देवाचे पालखीतुन स्नानासाठी भीमा नदी कडे प्रस्थान झाले.

त्यानंतर पालखीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी ठिकाणी देवाला पंच आरतीने ओवाळले. पालखीपुढे सदानंदाचा येळकोट म्हणत भंडारा खोबरे उधळून देवाचा जयघोष करीत होते.

यावेळी महिला ,भाविक व लहान मुले मनमुराद नाचुन आनंद घेत होते.यावेळी पन्नास हजार त्यावर भाविक आले होते. यावेळी खेड पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता. गावातील शिंदे पाटील, भगत, गुरव,वाघे वायकर ,भोई रौंधळ भालेकर. गोरगल्ले,अशा वेगवेगळ्या मानकर्यांना याठिकाणी पिढीजात मान आहे.

श्री खंडोबा देवाचे ठीक बारा वाजता भीमानदी तीरी अभ्यंगस्नान झाले व त्यानंतर तीन ठिकाणी विसावा घेऊन पालखीचे पुन्हा गडाकडे प्रस्थान झाली.पालखीबरोबर आईमाऊली मंडळाने खुप मोलाचे सहकार्य केले. खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष व संचालक मंडळ यासर्वांनी या ठिकाणी नियोजन केले.
