मारुती सहादू बोत्रे यांनी सहाय्यक निबंधक, राजगुरुनगर यांच्याकडे दावडी येथील भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पैनल च्या नवनियुक्त सदस्यांना अपात्र ठरविण्या बाबतचा अर्ज दिलेला आहे.
गाव मौजे दावडी येथील सोसायटी निवडणूक नुकतीच झाली असून भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पैनलचे सभासद १) साहेबराव कोंडीबा ढुंडे २) प्रकाश खंडू शिंदे ३) रामदास अनंता बोत्रे व इतर निवडणुकीत निवडून आले आहेत. या नवनियुक्त सदस्य यांना तीन आपत्य आहेत अशी मारुती सहादू बोत्रे यांनी अर्जातून तक्रार केली आहे.
सदर सदस्यांना २००१ नंतर तीन आपल्या असून, शासकिय नियमांचे पालन न करता त्यांनी निवडणूक लढवली आहे असे त्यांनी अर्थात नमूद केले आहे. सरकारी नियमानुसार तीन आपत्य असणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही निवडणुकीस उभे राहता येत नाही तरी सदर भैरवनाथ शेतकरी सहकार विकास पॅनल चे सभासद निवडून आले आहेत असे मारुती सहादू बोत्रे यांचे म्हणणे आहे.
निवडून आलेल्या सभासदांवर कारवाई करावी यासाठी मारुती सहादू बोत्रे यांनी पुरावे जोडल्याचे नमुद केले आहे.