वाशिम जिल्ह्यातील लोकाभिमुख पत्रकार व स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया जिल्हा प्रतिनिधी फुलचंद भगत यांना निर्मिका फाउंडेशनच्यावतीने पत्रकार भुषण पुरस्कार देण्यात आला आहे.
निर्मिका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र राज्य सचिव हरेष देखणे यांच्या नेतृत्वाखाली २ मे रोजी महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली होती तेव्हा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र त्या कार्यक्रमात फुलचंद भगत यांना उपस्थित रहाता आले नाही म्हणूनच ते त्यावेळी पुरस्कार स्वीकारायला नव्हते.
दिनांक २७ मे रोजी फुलचंद भगत यांनी चाकण (पुणे) येथे उपस्थित राहून पुरस्काराचा स्विकार केला आहे. यावेळी स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया संपादक व मुख्य संचालक ॲड प्रितम रामदास शिंदे, सहसंपादक व राज्य संचालक निलेश रसाळ, खेड तालुका जनसंपर्क अधिकारी लहू लांडे हे उपस्थित होते.