निबोंली ता. धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विवेक मोरे, सुजीत देशमुख वैभव अमृतकर, कार्तिक मीनाक्षी, विलास देशमुख हे होते.

कोणत्या गावांमध्ये कोणत्या पिकांवर कोणती अडचण त्यानुसार ही चर्चासत्र ठरली जातात. कापूस पिकां सोबत सोयाबीन, तुर या पिकांबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच शंखी गोगलगाय निर्मुलन चा विषय सुद्धा घेतला गेला. ग्रामपंचायत ने देखील शंखी गोगलगाय बद्दल ठराव घेऊ अशी ग्वाही सुद्धा दिली. बीबीएफ टेकक्निक तथा ऑरगॅनिक कार्बन वाढीसाठी चर्चा सत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
