धामनगाव मध्ये शेतकरी हीताचा वेगळा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये १०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्यांत हा उपक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
जळका पटाचे गावांमध्ये शंखी गोगलगाय चा प्रादुर्भाव आहे त्यामुळे मुख्य मार्गदर्शन, त्याचे निर्मुलन व कापूस पिकासोबत सोयाबीन, तुर पिक घेणेबाबत चर्चा करण्यात आली. बीबीएफ टेकक्निक तथा ऑरगॅनिक कार्बन वाढीसाठी चर्चा सत्र जळका पटाचे ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे घेण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक विवेक मोरे, वैभव अमृतकर, कार्तिक मीनाक्षी, विलासराव देशमुख, विवेक चर्जन, सुजीद देशमुख आदी बालाजी फाउंडेशन च्यावतीने उपस्थित होते. बालाजी कृषि केन्द्र, धामनगाव रेल्वे चे संचालक सुजीत मुंदडा, अर्जुन भंडारी आदीही उपस्थित होते.