चाकण शहरातील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक जयदेव सिंग दुधाणी यांची नुकतीच स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चाकण शहरात नगरपरिषद क्षेत्रात “क्षेत्रिय बातमीदार” (Zonal News Reporter) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून चाकण क्षेत्रात बातमीदार म्हणून कार्य करण्यासाठी त्यांना संपादक ॲड प्रितम रामदास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी स्वराज्य वार्ता खेड तालुका संबंध अधिकारी (Taluka Relation Officer) लहू लांडे व औरंगाबाद विभाग संचालक (Divisional Director) संतोष हजारे हे देखील उपस्थित होते.