चाकण पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजि.नं.१७४/२०२१ क्रि.पो.को.कलम १७४ हा अकस्मात मृत्यू या. १०/१२/२०२१ रोजी १२:३० वाजणेच्या सुमारास मौजे चाकण गावचे हद्दीत ग्रामीण रुग्णालय चाकण येथे उपचार पुर्वी घडलेला असून तो दिनांक १०/१२/२०२१ रोजी १६:०० वाजता दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील मयताचे वर्णन खालीलप्रमाणे – एक बेबी नाव असलेले स्त्री जातीचे प्रेत अंदाजे वय – ४५ वर्षे, अंगाने कुपोषित, केस काळे- पांढरे, गळ्यात – काळ्या व भगव्या रंगाचे काळे मणी असलेले धागे.

तरी वरील फोटो मधील वर्णनाच्या मयत स्त्रीचा व तिचे नातेवाईकांचा शोध होणेकामी सदर माहिती प्रसिद्ध केली आहे.
चाकण पोलिस ठाणे सदर अनोळखी मयत महिला व तिचे नातेवाईकांचा शोध घेत असून नागरिकांनाही माहिती देणेचे आवाहन करण्यात आले आहे. कोणाला सदर अनोळखी मयत महिलेबद्दल माहिती असेल तर एस. एस. चव्हाण, पोना/१४१६, चाकण पोलीस ठाणे यांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.