खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 374/2022 भारतीय दंड विधान कायदा कलम 307,368,364,143, 147,149 प्रमाणे फिर्यादी- सुषमा शंकर नाईकडे, वय 25 वर्षे, धंदा घरकाम, रा. कडधे, भैरवनाथ मंदीराचे जवळ, ता. खेड, जि. पुणे यांनी आरोपी-1) वासुदेव गेणभाउ बोंबले, 2) पवन बोंबले, दोघेही रा. वेताळे, ता. खेड, जि. पुणे. 3) स्वप्निल बबन सावंत 4)निलेश पाराजी नाईकडे 5) त्रुशिकेश उर्फ लखन नाईकडे, 6) विलास बाबुराव परसुडे चौघेही रा. कडधे ता. खेड, जि. पुणे. यांचे विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
दिनांक 25/05/2022 रोजी रात्री 12/30 वाजताचे सुमारास मौजे कडधे ता. खेड, जि. पुणे गावचे हद्दीत निलेश नवनाथ नाईकडे यांचे घराचे समोर वरातीमध्ये गुन्ह्यातील हत्यार -दगड, विट यांच्या सहाय्याने जखमी-शंकर (आप्पा) शांताराम नाईकडे रा. कडधे, ता. खेड, जि.पुणे.यांचेवर हल्ला करण्यात आल्याची फिर्याद नोंदविली गेली आहे. तसेच खुन झाला असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.

दिनांक 25/05/2022 रोजी रात्री 12/30 वाजताचे सुमारास मौजे कडधे ता. खेड, जि. पुणे गावचे हद्दीत निलेश नवनाथ नाईकडे यांचे घराचे समोर वरातीमध्ये शंकर (आप्पा) शांताराम नाईकडे रा. कडधे, ता. खेड, जि.पुणे. यांना कोणत्यातरी कारणासाठी वरातीमधील 1) वासुदेव गेणभाउ बोंबले, 2) पवन बोंबले, दोघेही रा. वेताळे, ता. खेड,जि.पुणे. 3) स्वप्निल बबन सावंत 4) निलेश पाराजी नाईकडे 5) त्रुशिकेश उर्फ लखन नाईकडे, 6) विलास बाबुराव परसुडे चौघेही रा. कडधे ता. खेड, जि. पुणे. यांनी व इतर मुलांनी बेकायदेशीर जमाव जमवुन दगड, विट, इत्यादीने मारहाण करून गंभीर जखमी करून शकर आप्पा नाईकडे यांना जिवे ठार मारण्याचे उद्येशाने त्यांच्या जवळील चारचाकी गाडी मधुन पळवुन नेले आहे. सोबत असणारे ओंकार दत्तात्रय नाईकडे यास किरकोळ जखमी केले आहे.
कडधे गावात व आजुबाजुचे परीसरात शंकर नाईकडे यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते कोठेही मिळुन आले नाही. आत्तापर्यंत शंकर नाईकडे यांचा शोध घेवून ही ते मिळुन न आल्याने फिर्यादीने वरील इसमांचे विरोधात रितसर फिर्याद नोंदविली आहे.
कडधे गावात मंगळवारी (दि २४) पार पडलेल्या एका लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसुन धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची, भांडणे होऊन त्याला लगेचच मारामारीचे स्वरूप आले. मयत शंकर याला गुन्ह्याची पार्श्वभूमी असल्याने गाव परिसरात दहशत होती. अधिक काही घडण्यागोदार ठराविक युवकांनी एकत्रित पणे त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. दगड, विटांनी डोक्यावर मारहाण केली. त्यात तो निपचित पडला. भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणून त्याला एका वाहनात घालुन गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या कालव्याच्या पाण्यात फेकुन दिला.अशी हकीकत ग्रामस्थांनी सांगितली.
