(राजगुरुनगर, पुणे.) भूमि अभिलेख कार्यालय खेड येथील अनागोंदी कारभाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने सोमवार दिनांक २३ मे २०२२ रोजी जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र राज्य सचिव हरेष देखणे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन पार पडले. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड खेड तालुका संपर्क प्रमुख असिफ शेख हे आंदोलनाचे निमंत्रक होते.
हुतात्मा राजगुरू स्मारकातील अतिक्रमणबाबत, न्यायालयाचे निकाल होऊन देखील कोणतीही कारवाई होत नसलेबाबत, सर्वेअर यांची अरेरावी व त्यांचेवर होता नसलेल्या कारवाई बाबत तसेच इतर अनागोंदी कारभाराबाबत हे जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड चे पदाधिकारी व विविध संस्था संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
