मापोली ( ता . आंबेगाव ) येथील श्री गणेश विश्वस्त मंडळ व ग्रामस्तांच्या वतीने पठारवाडी ( चाकण ) शाळेतील राज्य आदर्श शिक्षक श्री. मनोहर दुलाजी मोहरे यांचा साहित्य , सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विश्वस्त आनंता लोहकरे , अध्यक्ष डॉ . आनंद कोकणे , रामचंद्र लोहकरे , ओंकार महाराज कोकाटे यांच्या शुभहस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
मनोहर मोहरे यांनी विविध विषयांवरील आकरा पुस्तके लिहीली असून मासिके ,वृत्तपत्रे व दिवाळी अंकातुन सातत्याने त्यांचे लेख प्रकाशित होत असतात . तसेच विविध सेवाभावी संस्था , वृध्दाश्रम , अनाथाश्रम आणि आदिवासी कातकरी , ठाकर समाजातील गरीब वंचित मुलांना त्यांनी लाखो रुपयांचे शैक्षणिक साहीत्य वाटप केले आहे. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयांमधून ‘संस्कार रुजवा पिढी घडवा’ या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत .
शैक्षणिक क्षेत्रातही मोहरे यांनी शाळांमधून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली आहे. कोरोना काळातही त्यांनी गुणत्तापूर्ण शिक्षण दिले आहे. समाजसहभागातून लाखो रुपयांची विकास कामे करून भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण बनवली आहे .
मोहरे यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेत मापोली ग्रामस्तांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला .यावेळी पं.स.सदस्या इंदुबाई लोहकरे, तानाजी करवंदे ,कृषी अधिकारी सुनिल लोहकरे, बंडू मुकणे, शिवाजी लोहकरे, तसेच ग्रामस्त , महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या .