चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा स्मिता ललित शहा यांना निर्मिका फाऊंडेशन व स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापुरुषांची जयंती महोत्सव कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्मिता शहा या शरद पवारांचे घनिष्ठ संबंध असलेले नेते स्व. बाबुभाई शहा यांची पुतणी व चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. अशोक शहा आणि श्रीमती छाया शहा यांची कन्या आहेत. तसेच ओतूर येथील नामवंत व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते स्व. ईश्वराला शहा यांच्या सून तथा ललीत शहा यांच्या पत्नी आहेत.
राजकीय व सामाजिक वारसा लाभलेले माहेर व सासर यामुळे समाजात काम करण्यासाठी एक महिला म्हणून स्मिता शहा यांना कधीही अडचण आली नाही. म्हणूनच ओतूर येथे दक्षता कमिटी व इतर संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. चाकण येथे स्थायिक झाले नंतरही त्यांनी नव्याने कामाला सुरुवात केली. चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला शहर अध्यक्षा म्हणून त्या राजकारणात सक्रिय आहेत. तसेच पोलिस मित्र संघटना व इतर संस्थांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेत आहेत.
कोरोना काळातही महिला म्हणून घरात न बसता राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात सहकार्य करत पोलिस सहकाऱ्यांना सरबत व नाष्टा वाटपात त्यांनी सहभाग घेतला. तसेच अनेकांना दवाखाना, औषधे व इतर मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कार्याचा विचार करून त्यांना निर्मिका फाऊंडेशन चे संस्थापक हरिषभाई देखणे यांच्या पुढाकाराने समाजभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.