राष्ट्र सेवा दल साथी, शेतकरी संघटनेचे पहिले सत्याग्रही, स्व. शरद जोशी, स्व. भाई वैद्य, स्व. पद्मभूषण शिवाजीराव गिरीधर पाटील यांचे सहकारी, स्वातंत्र्य सेनानी,ज्येष्ठ समाजसेवक, देशभक्त, स्व. द. भि. तथा मामा शिंदे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त निर्मल ग्राम आश्रम, ठाकूर पिंपरी येथील अनाथ मुलांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणारे साहित्य… पाण्यासाठी प्लास्टिक पाईप, दोन टफ तसेच कडधान्य, मसाले ई. देण्यात आले. त्यावेळी उपस्थित दुर्गाई मेंबर राजेंद्र शिंदे, किशोर जगनाडे, श्री. प्रशांत गोलांडे, अनिल नायकवाडी व तेथील संचालिका हे उपस्थित होते.