(प्रतिनिधी फुलचंद भगत)
मंगरुळपीर :- कोणताही पगार नाही मात्र तरीही 24 तासांची सेवा तीही स्मशानात. येथील हिंदू स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देणाऱ्या स्मशाणजोगी संतोष महाराज यांच्या कुटुंबाची दिवाळी नगरसेवक अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने गोड झाली आहे.
येथील हिंदू स्मशानभूमीत संतोष महाराज हे कुटुंबासह राहून स्मशानातील प्रेतात्म्यांची अहोरात्र सेवा करतात. हे कुटुंब स्मशानातच वास्तव्यास आहे. येथे अंतिमसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहाचे अंतिम संस्कार व त्यासंबंधित व्यवस्था हे कुटुंब पाहते इतर वेळेत स्मशानातील इतर व्यवस्था हे कुटुंब करीत असते त्यांना कोणताही पगार नसून त्यांची सेवा विनामूल्य असते. मृत व्यक्तीच्या परिवारातील काही नातेवाईक त्यांची सेवा पाहून त्यांना थोडेतिडके पैसे देत असतील तेच त्यांचे उत्पन्नाचे एकमेक साधन असते. सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना हे कुटुंब मात्र स्मशानातील निरव शांततेत दिवाळीच्या झगमटापासून कोसो दूर आहे.
