ओळखीने कंपनीत गाडी लावतो,भाड्याने घेतलेल्या कित्येक गाड्या परस्पर गहाण, साबळेवाडी मधील धक्कादायक प्रकार

राजगुरूनगर वार्ता :- तुम्ही गाडी विकत घ्या, मी ओळखीने गाडी कंपनीत लावतो, असं सांगत भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, पुणे जिल्ह्यातील खेड तालुका चाकण जवळील साबळेवाडी येथील ही घटना घडली आहे.विशेष म्हणजे आरोपी हा साबळेवाडी येथील माजी उपसरपंच आहे.

माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, असे सांगून या महाभागाने नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी शुभम बाळू सांडभोर वय 26 वर्षे (रा.थिगळस्थळ,राजगुरूनगर ता.खेड जि. पुणे.) फिर्याद नुसार खेड राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून. पोलीसांनी, आरोपी-सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी ता. खेड जि. पुणे) यास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 03/10/2020 रोजी पासुन ते आज रोजी पर्यंत वेळोवेळी शुभम प्रोव्हीजन जनरल स्टोअर्स थिगळस्थळ राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे येथे इसम सागर मोहन साबळे रा. साबळेवाडी ता. खेड जि. पुणे याने फिर्यादी तसेच फिर्यादी व्यतीरीक्त, आणखी 7 लोकांकडून एकूण 10 गाडया भाडेतत्वावर नोटरी करारनाम्याने घेवून जावून, आम्हास वरील 10 गाड्यांचे ठरले प्रमाणे काही महीने पैसे पाठविले, व नंतर ठरल्याप्रमाणे पैसे पाठविणे बंद करून वरील गाडया आम्हास न देता अपहार करुन सागर साबळे यांनी फसवणूक केली आहे .पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील साबळेवाडी येथे ही घटना घडली .

या प्रकरणी पुढील अधिक तपास दाखल अंमलदार -पो.स.ई पडळकर सो. व तपासी अंमलदार-पो स ई भोसले (खेड पोलीस स्टेशन) हे करत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!