दीपावली संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर साजरी होत असताना दर्यापूर येथील शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट परिवाराने दीपावली श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा दर्यापूर येथे साजरी केली.
त्या निमित्ताने सकाळी साडेपाच वाजता सर्व मुलांना सुगंधी उटणे मोती साबण लावून आपल्या मुलांसमवेत सर्व मुलांचे अभ्यंगस्नान केले, त्यानंतर सौ अश्विनी गोपाल अरबट पोलीस पाटील तामसवाडी यांनी सर्व मुलांना अक्षवान करून पंचारती ओवाळले, त्यानंतर गाडगेबाबांची सामूहिक प्रार्थना आरती झाली व सर्व मुलांना दीपावलीचे फराळची मल्हार अरबट व आयुष अरबट यांच्या हस्ते आश्रमाचे संचालक गजानन देशमुख यांच्या उपस्थितीत देण्यात आले, गोपाल अरबट व सौ अश्विनी अरबट यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या बालगृहाचे व्यवस्थापक रितेश देशमुख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.