शहरात प्रथमच दिवाळी माऊली ग्रुप प्रस्तुत नादोत्सव दिवाळी पहाट च्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध यशस्वी आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
माऊली ग्रुप प्रस्तुत
नादोत्सव दिवाळी पहाटचे आयोजन दि. २ नोव्हेंबर २०२१ माहेश्वरी भवन अकोट रोड येथे पहाटे सहा ते आठ या वेळेत सुमधुर गीते, भक्ती गीते, पाडवा पहाट सह दीपावली वर आधारित भक्ती गीते रसिकांसाठी आयोजन करण्यात आले होते. अथक परिश्रमानंतर माऊली ग्रुपला दिवाळी पहाट प्रस्तुत करण्याचं यश मिळालं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन हे सालाबादाप्रमाणे केले जात असते मात्र ग्रामीण भागासह तालुक्याच्या ठिकाणी हा आगळावेगळा कार्यक्रम माऊली ग्रुप प्रस्तुत नादोत्सव दिवाळी पहाटचे आयोजन शहरातील कलाकार मंडळींनी एकत्र येत दर्यापूर मधील रसिकांसाठी खास पर्वणी घेऊन आले होते.
सकाळचे सुमधुर गीते श्रोत्यांनी ऐकण्याचा आनंद घेतला गीतांच्या सुमधुर वाणिने अक्षरशः अंगावर काटे उमटले तालुक्यात प्रथमच दिवाळी पहाट चे यशस्वी आयोजन आज पार पडले या करिता ऋषिकेश सरोदे तबलावादक सागर इंगळे हार्मोनियम वादक ऋषिकेश पुरी ऑक्टोपॅड वादक अंकुश कांबे बासरीवादक अमोल गावंडे तालसंगत मनीषा गावंडे सूत्रसंचालन प्रा मनीषा पाटील सुप्रसिद्ध गायिका अनिल सोनोने सुप्रसिद्ध गायक सागर काळे कीबोर्ड वादक हर्ष शिवानंद चव्हाण ह्या ग्रामीण शहरी भागातील कलाकार मंडळींनी तालुक्यात आपलं नाव रेखाटला आहे तरी दर्यापूर शहरातील संगीतप्रेमींनी या दिवाळी पहाट चा मनमुराद आनंद घेतला .
यावेळी उपस्थित शहरातील संगीतप्रेमी ऍड श्रीरंग पाटील अरबट गजानन देशमुख विजय विल्हेकर लाखे सर सरदार सर जितेश सर शिवानंद चव्हाण सौ चव्हाण सचिन मानकर संकेत भुतडा मेहेरे सर प्रा तृषार कडू सर सह आदी महिला मान्यवर मंडळी उपस्थित होत्या तर साऊंड सिस्टिम बुरघाटे यांनी पुरवली व माहेश्वरी भवन दर्यापूर महालक्ष्मी वस्त्रालया राजवाडा हॉटेल गणोरकर पेट्रोल पंप यांनी अमूल्य सहकार्य केले यावेळी अध्ययन समाचार च्या वतीने कलाकारांना चहा-नाश्ता देण्यात आला तर माहेश्वरी भवन चे व त्यांचे कलावंतांनी आभार मानले.
प्रतिक्रिया —-
स्वर, मृदंग, तबला,टाळ चिपळ्या ह्यांच्या मुळे निर्माण होणाऱ्या एक आगळावेगळा आनंद, स्वर तालाच्या आंदोलनाचा संगीत मय नादोत्सवाची उत्पत्ती जो मनाची शक्ती, बुद्धीचा अंधार दुर घालवणार दिपावलीच्या शुभ पर्वावर सुंदर असा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नातून एक बहारदार संगीत नादोत्सवाचा कार्यक्रम आज आपल्या दर्यापूर शहरातील नवोदित कलाकारांनी साकर करून नगरातील रसीक श्रोत्यांना सुंदर अशी दिवळीची भेट माऊली गृपच्या कलावंतांनी दिली
- जितेश रापर्तीवार सर
(तबला वादक संगीत विशारद )
नादोत्सव दिवाळी पहाटचे आयोजन अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आले दर्यापूर चा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने माऊली ग्रुपने केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे
नादोस्तवच्या निमित्ताने सर्व दर्यापूरकर यांना मिळालेली ही सांगीतिक मेजवानी सर्वांना सुखावणारी वाटली सर्व कलाकारांचे व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन
- गजानन सरदार सर
(प्रबोधन विद्यालय व गायक)