अमरावती:- विवेक मोरे
दिनांक 2 नोव्हेंबर 2021 मंगळवार रोजी,मौजे कोठोडा येथे मा.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अमरावती श्री. अनिलजी खर्चान साहेब व उपविभागीय कृषी अधिकारी श्री. त्र्यंबके साहेब व श्री. रोषणजी इंदोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी हंगाम बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व सभा संपन्न झाली. सदर सभेमध्ये कृषी सहाय्यक पी.यू.लाडके यांनी हरभरा व गहू ही रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके व तूर पीकाचे फुलोरा व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.

या दरम्यान हरभरा पिकाचे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. हरबरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होत असून रोग येण्यापूर्वीच जर आपण बियाण्यास पेरणी पूर्वी बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केली तर आपण मर रोगाचे नियंत्रण करू शकतो. त्यासाठी शेतकरी बांधव यांनी सुरवतीला रासायनिक बुरशीनाशके व त्यानंत जैविक औषधांची क्रिया बीयाण्यावर करावी, त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीची 5 ग्राम प्रती किलो बियाण्यास लावावे तसेच राझोबिययम नत्र स्थिर करणारे जिवाणूव psb स्फुरद विरघळून उपलब्ध करून देणारे जिवाणू तसेच पालाश उपलद्ध करून देणारे जिवाणू खत महाएनपिके हे 8 ते 10 मिली प्रती किलो बियाण्यास लावावे, अशा प्रकारे हरभरा बियाण्यावर बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी.
