८७.४०लक्ष निधीतील विकास कामांचे आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण
सुरक्षित व अपघात विरहित अवागमनाला प्राधान्य-आ. सुलभाताई खोडके
प्रतिनिधी ओम मोरे:-
अमरावती :- ०२ नोव्हेंबर विकासाच्या संकल्पनेत सुसज्ज रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे निर्माण करणे महत्वपूर्ण असून यातूनच सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाला चालना मिळते. त्यामुळे शहरातील अनेक लहान-मोठे रस्ते एकमेकांना जोडून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे काँक्रीट जाळे पसरविण्याला आपले सर्वोतोपरी प्राधान्य असल्याचा विश्वास आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला.
गाडगे नगर भागातील विविध लोक वसाहतींमध्ये ८७.४० लक्ष निधीतील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. मूलभूत सोयी सुविधांच्या विशेष अनुदानातील ३७ लक्ष निधीतून एकता महिला मंडळ राठी नगर येथील रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. तर ११लक्ष निधीतून गाडगे नगर मधील रस्त्याला नवी चकाकी आली आहे. त्याच बरोबर परिसरातीलच प्रेरणा कॉलनी मध्ये दोन अंतर्गत रस्त्यांचा अनुक्रमे ८- ८ लक्ष निधीतून कायापालट झाला आहे. या विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून आमदार महोदयांनी लोकार्पणाची औपचारिकता साधली.तर राठी नगर मधील जलकुंभाच्या मैदानाला चेंनलिंक फेंनसिंग व ट्रॅक चे काम २३.४० लक्ष निधीतून करण्यात येणार आहे.
याचे भूमिपूजन देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक नागरीकांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्थानिक परिसरातील दुरवस्था निकाली काढून येथे विविध विकास कामे मार्गी लावल्या बद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचे आभार मानीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सर्वसामान्य जनतेचा विश्वास , जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व महिलाशक्तीने पाठीशी राहून दिलेले पाठबळ , यातूनच काम करण्याची ऊर्जा मिळत असून आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राखण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचे आमदार महोदयांनी यावेळी सांगितले . तर डॉ. भोजराज चौधरी यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले की , आ. सुलभाताई खोडके यांनी शहराच्या विकासासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नाने विकासाची मालिका सुरू असून कोरोना गंभीर असतांना सुध्दा खोडके दाम्पतींनी खंबीर राहून शहर विकासा बरोबरच आरोग्य, शिक्षण, व पायाभूत सुविधांच्या पुर्ततेसाठी दाखविलेली कार्यतत्परता ही अमरावती शहराला प्रगतीपथावर नेणारी आहे.