राजगुरूनगर | सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या निवासी विद्यार्थ्यांनवर काळाचा घाला ; चार जणांचा बुडून मृत्यू ,

पुणे वार्ता:- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरणात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची सहल आली होती.यातील 10 विच्या वर्गातील 2 मुलं आणि 2 मुलींचा धरणात बुडून मृत्यू झाला.

चासकमान धरणालगतच्या बुरसेवाडी हद्दीत कृष्णामूर्ती फाउंडेशनची सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा आहे. या शाळेला शुक्रवारपासून (२० मे) सुटी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विद्यार्थी सायंकाळी साडेचार वाजता चासकमान धरणाजवळ गेले आणि पाण्यात उतरले. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थी कमरेइतपत पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आली आणि त्यात सहा ते सात विद्यार्थी लाटेसोबत पाण्यात ओढले गेल्याने बुडाले.

यावेळी शिक्षकांनी त्यातील काही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, चौघे पाण्यात बुडाले. ग्रामस्थांच्या मदतीने चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

वास्तविक या शाळेतील मुलांना बाहेर सोडले जात नाही मात्र ही मुले बाहेर कशी आली हा प्रश्न समोर आला आहे. यामध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला असुन त्यांचे मृतदेह पाण्यातुन सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.

प्राथमिक माहितीनुसार, परीक्षित कुलदीप आगरवाल (वय 16 वर्ष ,मूळ रा. दिल्ली) , तनिषा हर्षद देसाई (वय16 वर्ष रा. बावधन पुणे), रीतीन धनशेखरवय 16 वर्ष. मूळ रा. इ रोड तामिळनाडू ) , नव्या प्रज्ञेश भोसले( वय 16 वर्ष मूळ रा. खारघर नवी मुंबई) हे चारही मृत मुले परराज्यातील आहेत.सध्या रा पुणे राजगुरूनगर असून पोलिस पंचनामा झाल्यावर सर्व घटना समोर येणार आहे. शाळा प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.पुढीलचा अधिक तपास राजगुरूनगर खेड पोलीस करत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!