खंडोबा माळ, खंडोबा मंदिर समोर, पूर्वा हौसिंग सोसायटी च्या वतीने खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गिय सुरेश गोरे यांचे बंधू नितीन गोरे यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष शेखर घोगरे, चाकण नगरपरिषद नगरसेवक महेश शेवकरी यांचाही सन्मान करण्यात आला त्यावेळेस सोसायटीचे बिल्डर वसंत बिरदवडे हे देखील उपस्थित होते.

यावेळी समिर सिकीलकर, विजय धाडगे, निलेश धाडगे, विजय भोसले, गणेश भंडारे, नवनाथ मुंडे, हनुमान कांबळे, विनायक क्षीरसागर, मधुकर गावडे, सागर पोळ, संदीप इचके, निलेश कुमार माळी, महेश कुंभारे, राजेंद्र गोतारणे, उत्तम धाडगे, विकास घाडगे, अशोक शिंगाडे, गणेश गोडसे, सिंग साहेब यांच्या वतीने नितीन गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
