
चाकण मधील प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन स्वर्गिय आमदार सुरेश गोरे यांचे बंधू तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सदर विकास कामे मंजूर आहेत.
माजी नगराध्यक्ष शेखर श्रीराम घोगरे हे या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. शेखर श्रीराम घोगरे हे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक असून स्नेहा नितीन जगताप या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका आहेत. सदर कामामुळे दोन्ही प्रभागातील अंतर्गत रस्ते व गटार योजना यांची समस्या सुटणार आहे.
या विकास कामाबाबत चे फलक माजी नगराध्यक्ष शेखर श्रीराम घोगरे यांनी लावले असून यामुळे आगामी निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्याची चाहूल दिसून येत आहे. मागिल पंधरवड्यापुर्वीच चाकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांनी चौकाचौकात फलक लावत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले होते. मागिल आठवड्यात भारतीय जनता पक्षाचे वतीनेही भूमिपूजन कार्यक्रम केले होते.
