
चाकण येथील पुणे नाशिक हायवे लगत असणाऱ्या सर्व्हिस रोड शेजारील सांडपाणी जाण्यासाठी तयार केलेल्या गटारी वर झाकण नसल्याने तेथे वारंवार अपघात होत असतात. कधी पादचारी तर कधी दुचाकीस्वार या खड्ड्यात पडण्याचे प्रकार यापूर्वी तेथे घडले होते. नुकतेच एक दुचाकीस्वार त्या खड्ड्यात दुचाकी सह गेला होता व थोडक्यात बचावला.
सदर खड्डे बुजवून त्यावर झाकण टाकण्यात यावे अशी मागणी करत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी व मनसे चाकण शहर अध्यक्ष दत्तात्रय परदेशी यांनी पीडब्ल्यूडी व चाकण नगरपरिषद यांना मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पुढील काळात हे खड्डे बुजवले गेले नाहीत तर मनसे तिव्र आंदोलन करणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
