चाकण वार्ता (प्रतिनिधी लहू लांडे) :- पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक विभागाने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक फोडून सिग्नल बसवले आहेत. मात्र आता अशा दुभाजक फोडलेल्या भागात अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

पुणे नाशिक महामार्गावर कांडगे कमानी जवळील नव्याने फोडण्यात आलेल्या दुभाजाकाजवळ मंगळवारी (दि. १७ मे २०२२ रोजी ) पहाटे दोन वाजता दोन मोटार कारचा अपघात झाल्याची बाब समोर आली आहे. मार्केट यार्ड जवळील कमानी जवळ होंडा सीटी कंपनीची कार तीचा रजि नंबर एम एच ०२ बि.डी ६९५५ असा असलेल्या ह्या एका चारचाकी कारला गाडीला एका चारचाकी कारला पाठीमागुन ठोस देणारी मारुती सुझुकि स्वीफ डिझायर कार नंबर एम एच १४-डि एक्स-२०१४ ह्याला जोरदार धडक दिली .
