निर्मिका फांऊडेशन व स्वराज्य वार्ता डिजिटल मिडिया न्युज चँनेल यांच्या वतीने ” जयंती महामानवांची ” या कार्यक्रमाचे दि.२ मे २०२२ रोजी आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले – २०२२ सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार मा. जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दिलीप मोहिते-पाटील यांना जाहीर करण्यात आला. सुरेखा दिलीप मोहिते-पाटील यांचा दिनांक १६ मे रोजी वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या दिवशी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार – २०२२ पुरस्कार देण्यात आला.

यावेळी हरेशभाई देखणे (अध्यक्ष- निर्मिका फांऊडेशन), अँड.प्रितम शिंदे (संस्थापक – स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया), पै. संजय सावंत (मा. सरपंच ,शिरोली), संजय एकनाथ सावंत (सामाजिक कार्यकर्ते ,शिरोली), निर्मला देखणे (सचिव -निर्मिका फांऊडेशन), असिफ शेख ( प्रतिनिधी स्वराज्य वार्ता), लहू लांडे (तालुका जनसंपर्क अधिकारी स्वराज्य वार्ता)
