मनोहर मोहरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


चाकण (ता. खेड ) तालुक्यात पठारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक मनोहर दुलाजी मोहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .


मोहरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक भिशी, अक्षर मेहंदी, अंथरलेले वाचनालय , ऑनलाईन अभ्यास, मोबाईल वरून घरचा अभ्यास , छोटीशी मदत असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच १० लाख रुपयांचा लोकसहभाग मिळवून शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण केली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाचन – लेखन चळवळ सुरु केली आहे . त्यांची एकूण ११ पुस्तके प्रकाशित असून ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली आहे .


भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाटयगृहात सीने अभिनेत्री निशीगंधा वाड, शिक्षक आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील , जयंत आसगावकर ,आयुक्त सुरज मांढरे , शिक्षण अधिकारी सुधीर तांबे, हारून आतार यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला . याबद्दल अशोक ठाणगे ,गजानन पुरी , नामदेव गायकवाड , अध्यक्ष शांताराम नेहेरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!