निराधार आजारी व्यक्तीस उपचारासाठी चाकण
पोलिस स्टेशनचा आधार…

निराधार आजारी व्यक्तीस उपचारासाठी चाकण
पोलिस स्टेशनचा आधार… समाजसेवक दादासाहेब गायकवाड आणि कैलास दुधाळे यांचे लाभले सहकार्य ..

चाकण – येथील चक्रेश्वर मंदिराजवळ दिड महिन्यापांसुन बेवारस अवस्थेत असलेली एक आजारी व्यक्ती राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास दुधाळे यांच्या निदर्शनास दोन दिवसांपुर्वी आली असता त्यांनी त्या व्यक्तीची सखोल चौकशी केली. त्यांना कोनीही नातेवाईक नाहीत ते निराधार आहेत त्यांचे नाव मुनेश्वर तिवारी सांगत आहे व ते झारखंड येथील असल्याचे सांगतात.

त्यांचे दोन्ही पाय मोठ्या प्रमाणात सुजलेले आढळुन आले असता कैलास दुधाळे यांनी या व्यक्तीला वैदयकिय उपचार मिळावेत या करीता समाजसेवक रुग्ण हक्क आंदोलनाचे संस्थापक पुणे येथील दादासाहेब गायकवाड व चाकण पोलिस स्टेशनला माहिती दिली .

आज दिनांक १५ मे २०२२ रोजी चाकन पोलिस स्टेशन व समाजसेवक दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातुन तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे आणि पिंटु गावडे यांच्या सहकार्याने सदर निराधार व्यक्तीस वैदयकिय उपचाराकरीता ससुन येथे ॲडमिट करण्यात आले आणि माणुसकी जपन्यात आली.

यावेळी समाजसेवक रुग्न हक्क आंदोलनाचे संस्थापक दादासाहेब गायकवाड हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक कैलास दुधाळे सामाजिक कार्यकर्ते पिंटु गावडे, मछिंद्र पवळे अमिर पाटोळे चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिंगारे साहेब, क्राईम पी.आय.देवडे साहेब, ठाणे अंमलदार Psi चव्हाण साहेब, Psi बामणे साहेब, पोलीस हवालदार . सुपेकर ,पेट्रोलिंग बीट मार्शल पोलीस अंमलदार रावते, पोलीस अंमलदार गंगावणे.ए.पी. आय श्री.विक्रम गायकवाड साहेब यांचे अनमोल सहकार्य लाभले ..

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!