निर्मिका फाऊंडेशन व स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापुरुषांची संयुक्त जयंती कार्यक्रमात चाकण येथील मनोज इलेक्ट्रॉनिक चे मालक मनोज मांजरे यांना उद्योजक भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मनोज मांजरे हे चाकण मधील नामवंत व्यवसायिक असून सुरुवातीला त्यांनी वीज महामंडळात कामास सुरुवात केली व नंतर ठेकेदार म्हणुन नशिब आजमावले. ट्रान्सपोर्ट व औद्योगिक वसाहतीत ठेकेदार यासह इतर व्यवसाय त्यांनी सुरुवातीला केले. छोटासा स्टेशनरी व नंतर इलेक्ट्रीकल साहित्य विक्रीचा व्यवसाय करत त्यांनी व्यापाराची सुरुवात केली. त्यांनी लावलेले रोपटे आज रोजी वटवृक्ष झाले आहे. मुक्ता लॉन्स या नावाने त्यांनी भव्य मंगल कार्यालय सुरू केले असून ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी चाकण भागात गृहनिर्माण संकुलेही बांधली आहेत.
योजनाबद्ध, नियोजनपूर्वक, चिकाटी व प्रामाणिकपणे व्यवसाय करत त्यांनी प्रगती साधली आहे. व्यापार करत असताना ग्राहकांचा विश्वास व प्रेम जिंकत त्यांनी सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले आहे. म्हणूनच ग्राहक असो वा इतर व्यावसायिक हे मनोज मांजरे यांचा कायमच आदर करतात. त्यांच्या या उत्कृष्ट वाटचालीचा व यशाचा यथोचित सन्मान करत निर्मिका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरेष देखणे व स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया चे संपादक ॲड प्रितम शिंदे यांच्या संकल्पनेतून त्यांना उद्योजक भुषण पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते मनोज मांजरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, भाजपा चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे, भाजपा चाकण शहर सरचिटणीस अरुण जोरी आदी मान्यवर उपस्थित होते.