स्वराज्य वार्ता प्रतिनिधी संकेत शिंदे (उदापूर)

उदापूर गावात मुंजाबा, नरसिंह महाराज, वीर या देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार -१५/०४/१९८९ साली झाली होती. १३/०५/२०२२ रोजी भव्यदिव्य अशी मांडव डहाळे व देवाची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

त्यामध्ये गावची पारंपारिकता असणारे लेझीम पथक गावकऱ्यांनी मनसोक्त आनंद लुटला या देवस्थानचे सर्व नियोजन समस्त धाकटे शिंदे पाटील परिवार हे पाहत असतात. मिरवणुकीला महिलादेखील कलशष घेऊन मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

सर्वांनी फुगड्या खेळण्याचा देखील मनमुराद आनंद लुटला. तसेच मुंबईकर व पुणेकर मंडळी देखील सहभागी झाले मिरवणुकीला रथाला बैलजोडी श्री प्रभाकर रघुनाथ शिंदे यांची होती. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एम .शिंदे सर यांनी केले. मिरवणूक झाल्यानंतर सर्वांनसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. समस्त धाकटे शिंदे पाटील परिवार मुंबईकर व पुणेकर मंडळी समस्त ग्रामस्थ उदापूर हे उपस्थित होते.
