
दिव्यांग निधी वाटप संदर्भात चाकण नगरपरिषद व दिव्यांग यांच्यात कायमच मतभेद होताना दिसतात. दिव्यांची निधी वाटप हे नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या ५ टक्के की, खर्च वगळून शिल्लक रकमेच्या ५ टक्के याबाबत दिव्यांगामध्ये कायम संभ्रम असल्याचे दिसून येते. यासाठी अनेकांकडून अनेकदा आंदोलने व पत्रव्यवहार झालेले आहेत.

नुकतीच दिव्यांग निधी वाटप संदर्भात चाकण नगरपरिषद येथे एक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्यावेळस प्रहार जनशक्ती पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष सुनील भाऊ जाधव,सामाजिक कार्यकर्ते किशोर जगनाडे, प्रहार अपंग क्रांती संघटना अध्यक्ष जीवन शेठ टोपे, बीजेपी ओबिसी मोर्चा चाकण शहर अध्यक्ष गणेश भाऊ गोरे,बीजेपी दिव्यांग आघाडी चाकण शहर अध्यक्ष अशोक पालिवाल व महिला, पालक, दिव्यांग आदी उपस्थित होते.
