राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे नियोजन

खेड वार्ता:- राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज रोजी दिनांक ७/५/२०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे नियोजन करण्यात आले होते.यात एकूण कोर्ट पेडिंग एकूण 2231 खटले होते .तर दाखल पूर्व खटले 3621 खटले राष्ट्रीय लोक अदालत मध्ये घेण्यात आले.

प्रस्तुत लोक अदालत चे उद्घघाटन माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस. एन राजूरकर साहेब व बार असोसिएशन चे अध्यक्ष नवनाथ गावडे साहेब यांचे हस्ते झाले.सदर कार्यक्रमाच्या वेळी राजगुरुनगर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एम. अंबळकर सो., श्री. एस. एन.पाटील सो.,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती. एस. एस.पाखले मॅडम, श्री. के. एच.पाटील सो., श्री. जी.बी.देशमुख सो., दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. आर. डी.पतंगे मॅडम, श्री. डी.बी.पतंगे सो., श्री. पि. ए.जगदाळे सो., श्रीमती. एन. एस कदम मॅडम.तसेच खेड बार असोसिएशन चे अध्यक्ष श्री. नवनाथ गावडे साहेब यांचे उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड बार असोसिएशन च्या सदस्या ॲड. रश्मी वाघुले यांनी केले.तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.नवनाथ गावडे यांनी केले.तर अध्यक्षीय भाषण माननीय जिल्हा न्यायाधीश राजूरकर साहेब यांनी केले. व खेड बार असोसिएशन चे खजिनदार ॲड.प्रवीण पडवळ यांनी आभार व्यक्त केले.

तसेच सदर लोकअदालत साठी उपाध्यक्ष अँड.संतोष दाते, अँड.ललित नवले , सचिव अँड. गोपाल शिंदे ,अँड.रेश्मा भोर ,लोकल ऑडिटोर अँड. संदीप दरेकर , सदस्य अँड. अबूबकर पठाण ,अँड.निलेश देशमुख , अँड.प्रतिभा होले यांच्यासह माननीय वकिल सभासद,न्यायालयाीन कर्मचारी व मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!