पुणे वार्ता:- खेड पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाची धडाकेबाज कारवाई, राजगुरुनगर शहरामध्ये जबरी चोरी करणारे एका आरोपीला केले गजाआड, त्याचेकडून महीलेच्या गळ्यातील मंगळसुत्र व एकूण १,९५,०००/- (एक लाख पचांन्नव हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल केला जप्त)
दिनांक ०२/०२/२०२२ रोजी सांयकाळी ०८.१० वा. चे सुमारास वाडा रोडने शगुन कलेक्शन समोरून फिर्यादी हे त्यांचे घरी जात असताना तीचे पाठीमागून टू व्हीलर मोटारसायकलवरील दोघे इसम येवून त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने तीचे गळयात असलेला १,१५,०००/- रू. किंचे मंगळसुत्र जोरात हिसडा मारून जयदरस्तीने तोडून घेवून गेले होते. त्याबाबत खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ७० / २०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा सखोल तपास चालू होता.
सदर गुन्हयाचा तपास चालू असताना गुन्हे शोध पथकस बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, वरील गुन्हयातील महीलेचे जबरीने चोरून नेलेले मंगळसुत्र १) अजय राजू शेरावत व २) अक्षय राजू शेरावत दोघे सध्या रा. गडवस्ती, हिंगणगाव ता. हवेली जि. पुणे या दोघांनी त्याचेकडील बजाज कंपनीची आर. एस. २०० पल्सर गाड़ी कं. एम. एच. १२ टी. एक्स. २६२० हीवर येवून चोरी केलेले आहे असे समजल्याने आम्ही वरील दोनही आरोपींचा व गुन्हयातील गेले मालाचा व वापरले वाहनाचा शोध घेत असताना
