चाकण वार्ता:- चाकण मधील जुना पुणे नाशिक हायवेवर जे पी ट्रॉफिक ऑटोमेशन pvt Ltd. पुणे पांडुरंग वाळुंज या कंपनीने चाकण हद्दीतील मार्केट यार्ड या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारलेली आहे. तसेच मुटकेवाडी, बंगला वस्ती, आळंदी फाटा या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारलेली आहे. त्याचे उद्घाटन खेड तालुका आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बिरवडी फाटा येथे सोलर ब्लिंकेर बसविले आहेत.

यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार दिलीप मोहिते पाटील,सुनील गोडसे वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी, चौरे साहेब वाहतूक विभाग, विजय भूमकर बाजार समिती अध्यक्ष ,तसेच पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



