स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील दौंडकरवाडी गावच्या ग्रामपंचायतिच्या नियुक्त उपसरपंचाने कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता.त्या रिक्त झालेल्या जागी रूपालीताई नवंनाथ म्हाम्बरे यांची बिनविरोध निवड झाली.त्यामुळे बायको उपसरपंच झाल्याने आनंदाने पतीने बायकोला चक्क जेसीबीवर बसुन गावात मिरवणूक काढण्यात आलेली पाहायला मिळाली.त्यामुळे एकच चर्चा गावभर रंगली होती.

डीजेच्या आवाजावर व गुलाल भंडारा उधळत नवीन ग्रामपंचायतीवर रुजू झालेल्या रूपाली म्हाम्बरे उपसरपंच यांचा सत्कार विविध मान्यवरांकडून करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, ऊद्योजक मयुरदादा मोहिते पाटील,खेड तालुका भाजपाचे अध्यक्ष शांतारामशेठ भोसले,माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि शेलपिंपळगाव नगरीचे माजी सरपंच शरदराव मोहिते पाटील, दावडी गावचे आदर्श सरपंच संभाजीआबा घारे,युवा ऊद्योजक फायनल सम्राट सचिनशेठ नवले, दावडी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब होरे, ग्रामपंचायत सदस्या धनश्रीताई कान्हुरकर, सोसायटी संचालक जीवनशेठ शिंदे माजी सरपंच दादासाहेब दगडे,खेड तालुक्याचे युवा सेना अध्यक्ष श्रीनाथदादा लांडे माजी सरपंच वामनशेठ लांडे चेअरमन नयनशेठ लांडे विवीध गावचे सरपंच सदस्य चेअरमन ऊपस्थित राहुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच गावकऱ्यांकडुन सत्कार करण्यात आला व गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील महिला, नागरिक, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
