चाकणमध्ये हिंदू सूर्य श्री महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात रंगोळी पायघडी, हालगी , ड़फडी ,पीपानी, महादेवाचे नंदी बैल, लाठी -काठी तलवार बाजी, दांडपट्टा, विद्युत रोशनाई, प्रभात बँड़, बैंजो, नाचनारे घोडे, उँट, ढोल-ताशा, पंजाबी ढोल या सर्वांचा समावेश मिरवणूकीत असणार आहे.

महाराणा प्रताप व शिवाजी महाराजांचा सुंदर रथ नयन रम्य मिरवनुक व नेत्र दीपक आतिषबाजी , मनमोहक अशी शोभा यात्रेमुळे नागरिकांचाही उदंड प्रतिसाद महाराणा प्रताप जयंती ला असणार आहे. आज दिनांक ९/५/२०२२ रोजी सोमवारी सायंकाळी ४ वाजता माणिक चौक ते महाराणा प्रताप चौक अशी मिरवणूक संपन्न होनार आहे

महाराणा प्रताप मित्र मंडळ व समस्त राजपूत समाजाच्या वतीने जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
