चाकण वार्ता:- प्रखर वक्ता महासती हिमानी जी म सा. यांच्या प्रेरणेतून, होळी चातुर्मास निमित्ताने, जैन समाजाच्या वतीने चाकण शहरात गेल्या काही महिन्यांपासून गरीब आणि गरजू नागरिकांसाठी ‘महावीर की रोटी’ हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या एक तारखेला समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरीब आणि गरजू व्यक्तींना जैन मंदिर ,जैन स्थानक येथे एक वेळचे मोफत जेवण व एक लिटर पाणी बॉटल दिले जात आहे. या उपक्रमातून एकप्रकारे सामाजिक बांधिलकीचा सेतूच जोडला जात आहे.
यावेळी उपस्थित मध्ये निर्मला चोरडिया,मंजुषा बोथरा,माया चोरडिया,कल्पना मुटके, सतिषश बोथरा,अनिल कुचेरीया,महेंद्र चोरडिया,प्रीतम शिंदे,सुवर्णा नहार,प्रीती चोरडिया,सुशीला बोथरा, सुनिता कोठारी आदी जैन समाज बांधव उपस्थित होते.






