चाकण वार्ता:- (प्रतिनिधी लहू लांडे) :- शिवा संघटना चाकण शहर शाखा व सर्व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आज क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची 891 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी 11 वाजता चाकण नगरपरिषद व नाणेकरवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील चाकण नगर परिषद येथे जयंती निमित्त शासकीय महापूजा करुन शासकीय अधिकाऱ्यांमार्फत पुष्पहार घालून महात्मा बसवेश्वर महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच अन्नदान (भोजन) करण्यात आले.
या प्रसंगी चाकण वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी येथे खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला लाईटचा प्रश्न मार्गी लावून लाईट पोल ची व्यवस्था केल्या बद्दल श्री. शिवा भाले यांचा सर्व समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विजय कंटीकर, चंद्रकांत हलगे, मारोती नागसाखरे, माधव कारामुंगे, गणेश सलगरे, शिवा भाले,सचिन कंटिकर,चंद्रकांत स्वामी,नंदू शेटे,सुखानंद हसनाळे,महेश बोन्डगे, बालाजी सुकणे,महालिंग सगनगिरे, नागनाथ भालकुडगे, रूपाताई कारामुंगे, दैवशाला नागसाखरे आणि समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. सचिन कंटिकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
