पुणे वार्ता:- खेड पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाची धडाकेबाज कारवाई, पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये मोटारसायकल चोरी करणारे टोळीचा पर्दा फाश, एकूण ८ मोटारसायकली सह २,४०,०००/- (दोन लाख चाळीस हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त
दिनांक १९/०४/२०२२ रोजी रात्री ११/०0 ते दिनांक २०/०४/२०२२ रोजी ०७.३० वा. चे दरम्यान, फिर्यादी यांची मौजे तुकाईवाडी गावचे हद्दीतील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे आवरात ता. खेड जि. पुणे येथे लावलेली माझी हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी नं. एम. एच. १४ जे.एस.०४३८ ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुददम लबाडीचे ईरादयाने चोरी करून चोरून नेले आहे. त्याबाबत खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. २९९ / २०२२ मा. द.वि. कलम ३७९, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास चालू होता.
दिनांक २५/०४/२०२२ रोजी ००.०१ वा. चे सुमारास आम्ही स्वतः तसेच पो. उपनिरीक्षक बी.एस.भोसले, पो. ना. एस. जी. जतकर , पो. कॉ. निखील गिरीगोसावी ,पो.कॉ. स्वप्नील गाढवे ,असे खेड शहरामध्ये पाबळ चौक येथे नाकांबदी करीत असताना त्याठिकाणी तीन इसम एका विना नंबरप्लेटवे स्प्लेंडर मोटारसायकल वर संशयीतरीत्या येताना दिसले. त्यावेळी त्या इसमांना थांबवून त्यांचेकडे चौकशी करून त्यांचे नाव पत्ता विचारले असता

त्यांनी त्यांचे नाव १) दिनेश दिलीप दुधावडे वय २५ वर्षे सध्या रा. घारगाव ता.संगमनेर जि. अहमदनगर,मुळ रा. शिळफाटा खोपोली ता. खालापूर जि. रायगड, २) भाऊ पांडूरंग मेंगाळ वय ३६ वर्षे सध्या रा. थोरांदळे ता. आंबेगाव
जि. पुणे मुळ रा. मुक्ताई ढाब्याजवळ, नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे, ३) विजय गुलाब सावंत वय ४२ वर्षे सध्या रा.१४ नंबर, कांदळी ता.जुन्नर जि. पुणे मुळ रा. वीरभद्र नगर, दाढ, आश्वि बुद्रुक ता. राहता जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे ताबेत असलेल्या मोटारसायकल बाबत त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी इसम नामे पप्पू पांडू मधवे रा. घारगाव ता. संगमनेर जि. अहमदनगर याचे मदतीने चोरी केली असल्याचे कबूली दिली
असून त्यांचेकडून खेड पोलीस स्टेशनकडील गुन्हयातील मोटारसायकलसह एकूण ८ मोटारसायकली असा एकूण २,४०,०००/- (दोन चाळीस हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त आले असून आळेफाटा, नारायणगाव, मंचर येथील गुन्हे उघडकीस आले असून उर्वरीत मोटारसायकल बाबत दाखल असणारे गुन्हयांबाबत माहीती घेणे चालू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे सो पुणे ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील सो, मा. पोलीस निरीक्षक सतिश गुरव सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. भोसले, पो.हवा. संतोष घोलप, पो.ना. सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखील गिरीगोसावी, पोलीस अंमलदार स्वप्नील गाढवे, शेखर भोईर, विशाल कोठावळे यांनी केली आहे.

खेड पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेल्या वाहनांची माहीती खालीलप्रमाणे