गळयावर वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या सराईत गुन्हेगारास चाकण पोलीसांकडुन अवघ्या १२ तासाचे आत जेलबंद

पुणे वार्ता :- दि. ३०/०४/२०२२ रोजी रात्री १०/४५ वा. चे सुमारास मौजे रासे गावचे हददीतील पाटील ढाब्याजवळ महेश बबन कड वय ३० वर्षे रा. कडाचीवाडी ता. खेड जि. पुणे हा त्याचे आय २० गाडीमध्ये इसम नामे आण्णा माने व त्याचा अनोळखी मित्र यांचेसह बसलेला असतांना आण्णा माने याने महेश कड याचेशी जुन्या भांडणाचे कारणावरून महेश कड याचे गळ्यावर व हनुवटीवरती चाकुने वार करून गंभीर दुखापत करून खुनाचा प्रयत्न केला तसेच आण्णा माने याचा अनोळखी मित्र महेश कड याचा मोबाईल व आय २० कार जबरदस्तीने घेवुन पळुन गेला.

सदर घटने बाबत बबन कड रा. कडाचीवाडी यांचे फिर्यादी वरून चाकण पोलीस स्टेशन गुरनं ६८९/२०२२ भादवि कलम ३०७, ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गंभीर गुन्हयाची दखल घेवुन चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील डि. बी. पथकाला सदर गुन्हयातील आरोपीस अटक करण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले.

चाकण पोलीस स्टेशनचे डि. बी. पथकाने सदर गुन्हयातील आरोपी बाबत माहिती घेण्यास सुरुवात केली त्यावेळी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी अमीत उर्फ आण्णा बजरंग माने रा.मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे हा खुनाचे गुन्हयातुन जेल मधुन पॅरोलवर बाहेर आलेला आहे. व तो सदरचा गुन्हा करून फरार होण्याचे बेतात आहे.

सदर माहितीचे आधारे पोकॉ नितीन गुंजाळ व पोकॉ अनिल कारोटे यांनी पुणे नाशिक रोडवर आळंदी फाट्यावर अतिशय शिताफिने ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर १२ तासाचे आत सदर आरोपीस अटक करण्यात आलेली असुन त्याची दिनांक ०५/०५/२०२२ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. आरोपी अमीत उर्फ आण्णा बजरंग माने हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गर्दी मारामारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन तो खुनाचे गुन्हयातुन पॅरोलवर बाहेर आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे साहेब, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गाकयवाड, पोसई सागर बामणे, पोहवा संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, निखील शेटे, पोकॉ नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, निखील वर्पे, अनिल कारोटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि प्रकाश राठोड हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!